Saturday, 31 March 2018

अनवस्था प्रसंग

कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील नेहमीचीच एक प्रफुल्लित करणारी सकाळ होती ती, बापूंच्या कँटीन मधून पोहे आणि चहा घेऊन मी आणि माझा एक जिवलग मित्र (या प्रसंगात नाव सांगणे उचित ठरणार नाही) horticulture डिपार्टमेंट पासून main building (MB) कडे निघालो होतो, बहुदा परीक्षेचा कालावधी असावा कारण चालत असताना कसल्याशा notes वाचण्यात मी दंग झालो होतो. Horticulture डिपार्टमेंट ते MB च्या पायऱ्या हा रस्ता आठवतोय ना मित्रांनो, आम्ही horti डिपार्टमेंट च्या इथे होतो आणि आमच्या पुढे काही अंतरावर Extn डिपार्टमेंट चे एक प्राध्यापक (इथे पण नाव सांगणे इष्ट नाही 😜) चालले होते. एवढ्यात माज्या त्या हरामी मित्राने त्या सरांच्या आडनावाने जोरात हाक मारली आणि उलट दिशेने चालू लागला, सरांनी पाठीमागे वळून पाहिले आणि मी आ वासून त्यांच्यापुढे उभा होतो..... एकटाच. प्रस्तुत प्रसंगात मला निरपराध ठरवणारा एकही पुरावा आणि साक्षीदार तिथे उपस्थित न्हवता, यानंतर माज्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी. तब्बल एक आठवडा सरांची माफी रोज न चुकता मागत राहिलो त्यावेळी कुठे मला lecture attend करायची परवानगी मिळाली, आज तो प्रसंग आठवून खूप हसतो मी आणि माझा 'तो' मित्र, पण खरं सांगू त्यावेळी जाम फाटली होती राव 😃



🌱नवनाथ भोसले k 01🌱

No comments:

Post a Comment

आठवणी

कोल्हापूर कृषि महाविद्यालयात शिकत असतानाच्या संटेपणातील अनेक आठवणी आहेत. खरे तर आपल्याच कॉलेजच्या मुली म्हणजे वर्गभगिनी . बहिणींचेही भावावर...