Saturday, 31 March 2018

परी

*कहाणी एका परीला पाहाण्याची*
  ले.  आप्पासाहेब गौड
Agricos के 86


कोल्हापुरात आम्ही मेसला राजारामपुरी येते जेवायला जात असू. आमच्यासारखेच बरेच Agricos त्या गल्लीत जेवायला जात .
मेसच्या जवळच एका कॉर्नरला एक छोटसंच साधं पण टुमदार घर होते.
त्या इवल्याशा घरात एक परी राहात होती.
आम्ही जेवायला जायच्या वेळी ती परी पांढरेशुभ्र कपडे कपडे परिधान करुन त्या इवल्याशा घराच्या उंब-यावर बसलेली दिसायची.
  आपल्या प्रत्येक Agricos ची तेथे येताच चालण्याची गती आपसूकच मंदावत असे
त्या ठिकाणी जवळपास सर्वच Agricos सौर्दयाचं ते मोहक रुप कळत - नकळत न्याहाळत असत.
  कोण जाणे कसे काय पण एके दिवशी काय झाले आणि तिच्या भावाला मनात शंका आली. तसा तो ही अपंग होता.
  त्याने गल्लीतील पोरं गोळा केली आणि माझ्या बहीणीकडे काय पाहाताय म्हणुन काही agricos ना तेथेच बदडायला सुरुवात केली.
    मी स्वत्त: व सचिन लोंढे आम्ही जिवाजी होस्टेलच्या शेजारील रुमवर तातडीने निरोप पाठवला
त्या रुमवर भीमपराक्रमाला शोभेल असे आपले  जिवाला जीव देणारे मावळे राहत होते. आणि ते होते सतीश पवार संजय गोडसे , भास्कर जाधव आणि अरविंद जगताप.
बातमी कळताच मावळे आहे त्या परिस्थितीत नेसत्या लुंगीवर धावत तेथे आले.येथे agricos चे एकमेकांवरील प्रेम व जिवाला जीव देण्याची भावना प्रकर्षाने अधोरेखीत होते. तेथे
 तुडुंब ठोकाठोकी सुरु झाली . पण मला आणि लोढेला कोणी हात सुध्दा लावला नाही कारण आमची तब्बेतही तशीच होती.शक्यतो आम्ही त्यांना त्या गल्लीतीलच असल्याचे वाटले असेल त्यांना. आमचे मावळे धुवांधार फायटिंग करीत होते . हळूहळू त्या गल्लीतील इतर पोरंदेखील जमा झाली .आपल्या मावळ्याना हॉकी स्टीकने आणि काठीने ठोकायला लागली.मावळ्यांच्या डोक्यातुन रक्त यायला लागले पण एकही मावळा मागे हटला नाही.
  दरम्यान मी धावत अजित पवार (आप्पा) राहात होते त्या फ्लैटवर धावत गेलो.
ते रुमवर नव्हते पण तेथे त्याच्याकडे हाँलीबाँलचे धडे गिरवण्यासाठी सांगलीची  एक खेळाडू राहात  होती 😀😀😀
तिने आप्पाना तातडीने निरोप धाडला.
  आप्पा आले तोपर्यत पोलीस आलेच होते
आप्पानी PI ला फर्मान सोडले .
गल्लीतील मारामारी करणारी सर्व मुले एक तासात पकडली गेली पाहिजेत.तो PI चालढकल करतोय असे दिसताच आप्पानी आपले  तहसीलदार ओळखपत्र दाखविले आणि PI ने आप्पाना सँलुट ठोकला आणि कामाला सुरुवात केली.
  परीच्या भावासह सर्व तेथील मुले लॉकअप मध्ये आत टाकली व कारवाई सुरू झाली.
    दुस-या दिवशीपासून शहरातील काही गुंड मुले CRL 69 या गाडीतून आपल्या होस्टेलला घिरट्या मारायला लागली.
तशी आपल्या ब-याच Agricos नी मेस उचगावला लावली
मी लोढे . अभय जाधव सध्या PI आहे तेथेच मेसला जात होतो . एक दोन दिवस रस्ता तेवढा बदलला.
    हा सर्व प्रकार पाहून ती परीही कोमजली . पण आजही आमच्या आठवणीत ती परी आणि CRL69 गाडी जशीच्या तशीच आहे.

No comments:

Post a Comment

आठवणी

कोल्हापूर कृषि महाविद्यालयात शिकत असतानाच्या संटेपणातील अनेक आठवणी आहेत. खरे तर आपल्याच कॉलेजच्या मुली म्हणजे वर्गभगिनी . बहिणींचेही भावावर...